Home Cities एरंडोल पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपतर्फे रक्तदान शिबीर

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपतर्फे रक्तदान शिबीर

0
32

 

एरंडोल, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्ताने भाजपतर्फे रा. ति. काबरे विद्यालयात रक्तदान शिबीर आणि ग्रामीण रूग्णालयातील कोवीड सेंटर येथे फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील, तालूका सरचिटणीस अमोल जाधव, नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर, जहीरोद्दीन शेठ कासम, अ‍ॅड. नितीन महाजन, डॉ.नरेंद्र पाटील, व्यापारी संघटना जिल्हाध्यक्ष सचिन विसपुते, शहराध्यक्ष निलेश परदेशी, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन, अजेंद्र पाटील, आबा चौधरी यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound