जम्मू वृत्तसंस्था। जम्मू – काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजुनं गोळीबार करण्यात आले पाकिस्ताननं भारताच्या दिशेनं मोर्टारही डागले. यामध्ये भारतीय लष्कराच्या १६ कोरमध्ये तैनात नायक अनिश थॉमस हा जवान शहीद झाला आहे. एका अधिकारी आणि दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.
सेनेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातल्या सुंदरबनी सेक्टरमध्ये हा गोळीबार झाला. भारतीय सेनेनंही या गोळीबाराला प्रत्यूत्तर दिलं. कोणत्याही चिथावणीविना शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं छोट्या हत्यारांच्या माध्यमातून गोळीबार केला. इतर जखमींवर सेनेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारतानं दिलेल्या प्रत्यूत्तराचा फटका पाकिस्तानलाही बसल्याचं समजतंय. पाकिस्तानी सेनेचे काही जवान या प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे