नवी दिल्ली – लोकांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. याच बरोबर, कोरोनावर जोपर्यंत औषध उपलब्ध होत नाही, तोपर्यंत सावध राहा. सुरक्षिततेत कसल्याही प्रकारची कसर सोडू नका. जोवर औषध नाही, तोवर सावध राहा, असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत मध्य प्रदेशात 12,000 गावांमधील 1.75 लाख घरांचे लोकार्पण करून 1.75 लाख कुटुंबांचा गृह प्रवेश करवला. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लाभार्थ्यांशीही संवाद साधला. कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन करत, माझे ऐका आणि “जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं, दो गज की दूरी, मास्क है जरूरी.” हा मंत्र लक्षात ठेवा. आपली प्रकृती चांगली रहायला हवी, असे मोदी म्हणाले.
देशातील लॉकडाउन संपल्यानंतर, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील नव्या रुग्णांचा विचार करता, भारतातच सर्वाधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. एकूण कोरोना संक्रमितांच्या संख्येचा विचार करता भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. तसेच अमेरिका आणि भारतातील संख्येतील तफावतही सातत्याने कमी होताना दिसत आहे.