जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात आज तब्बल १५५ रूग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यात आज एकूण ८६७ कोरोना बाधीत असल्याचे सायंकाळच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.
आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ८६७ रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीत आढळण्याचा ट्रेंड आजही कायम राहिल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. दरम्यान आज एरंडोल तालुक्यात आज तब्बल १५५ रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे एरंडोल तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर- ८४, जळगाव ग्रामीण-४४; भुसावळ-७६; अमळनेर-५३; चोपडा-७२; पाचोरा-३३; भडगाव-३६; धरणगाव-२४; यावल-२१; एरंडोल-१५५; जामनेर-१६; रावेर-३७; पारोळा-२३; चाळीसगाव-४७; मुक्ताईनगर-१७; बोदवड-१९ आणि इतर जिल्ह्यातील १० असे एकुण ८६७ रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ३०७ रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी २६ हजार ३८७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १३ रूग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकुण मृतांचा आकडा ९४६ वर पोहचला आहे. तर ९ हजार ९७४ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ७०.७३ टक्के असून मृत्यू दर २.५४ टक्क्यांवर आहे.