Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांनी आरोप सिद्ध करावे (व्हिडिओ )

अभिषेक पाटील यांनी आरोप सिद्ध करावे (व्हिडिओ )

0
30


 

जळगाव, प्रतिनिधी । महानगर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष अभिषेक पाटील यांनी पालिकेतील ६० नगरसेवकांनी शहर स्वच्छतेचा वॉटर ग्रेस ठेक्यात पाकिटे घेतली आहेत असा आरोप केला आहे. या आरोपाला प्रतिउत्तर देतांना भाजप शहर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी असे काही असेल तर अभिषेक पाटील यांनी लोकांसमोर ते सिद्ध करावे असे आव्हान दिले आहे.

भाजप शहर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचा महापालिकेत एक सुद्धा नगरसेवक नाही. त्यांना लोकांनी नाकारलेले असून अभिषेक पाटील हे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. याबाबत सत्य काय आहे त्यांनी जनते समोर उघड करावे. केवळ हवेत बफाऱ्या मारून चालत नाही.

ते फक्त आपली जाहिरात, फोटोग्राफी यासाठी हे सर्व करीत आहेत. असा कोणताही प्रकार घडलेला नसून हा ठेका प्रशासनानेच दिला आहे. कुठलाही नगरसेवक हा ठेका देत नसतो असे स्पष्ट करत त्यांनी अभिषेक पाटील यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्य सर्व संमतीने चालते. याउलट राष्ट्रवादीमध्ये एक वाक्यता नसल्याने त्यांची आंदोलने देखील वेगवेगळ्या सेलच्या नावाने होत असतात असा आरोप केला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/316355339589547/

 


Protected Content

Play sound