Home Cities जळगाव …मग ए.टी. नानांचे तिकिट कापणार असल्याची चर्चा कशासाठी- डॉ. पाटील (व्हिडीओ)

…मग ए.टी. नानांचे तिकिट कापणार असल्याची चर्चा कशासाठी- डॉ. पाटील (व्हिडीओ)

0
43

जळगाव प्रतिनिधी । राज्यात दुसर्‍या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होणार्‍या आणि सर्वेक्षणात ६५ टक्के गुण मिळवणार्‍या खा. ए.टी. नानांचे तिकिट कापण्याची चर्चा कशासाठी ? हा प्रश्‍न आज आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. यात ते म्हणाले की, खासदार ए. टी. नाना पाटील यांना गत लोकसभा निवडणुकीत राज्यात दुसर्‍या क्रमांकाचे मताधिक्य मिळवून विजयी झाले होते. यानंतर भाजपच्या सर्वेक्षणात त्यांना ६५ टक्के जनतेची पसंती मिळाल्याची चर्चादेखील होती. मात्र असे असूनही आता ए.टी. नानांचे तिकिट कापण्याची चर्चा कशासाठी ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. असे काही असेल तर याचे जनतेसमोर स्पष्टीकरण करावे अशी मागणीदेखील केली. आपल्याला याबाबत काही माहित नाही. मात्र आम्ही हा प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे डॉ. सतीश पाटील म्हणाले.

पहा :- डॉ. सतीश पाटील नेमके काय म्हणाले ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound