जळगाव प्रतिनिधी । धर्मरथ फाउंडेशन जळगाव व अदिती साडीया आयोजित गौरी गणपती आरास व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. आरास स्पर्धेमध्ये महिलांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला असून ह्याचा (दि.०7) रोजी वेळ.सायं.६ वा.निकाल जाहीर केला आहे. तसेच कोरोना या महारोगाच्या पार्श्वभूमी पाहता सोशल डिस्टन्सचे नियम लक्षात ठेवून धर्मरथ फाउंडेशने विजेता स्पर्धकांच्या घरी जाऊन त्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रथम क्रमांक:- रेणुकाताई राजू शिंगटे(के.सी पार्क) यांना साडी(2500) व पूजेचा ताट व प्रशस्तीपत्र देण्यात आले; द्वितीय क्रमांक- सौ.विमलताई वामन येवले (शिवाजी नगर) यांना साडी(1,500),पूजेचा ताट प्रशस्तीपत्र, देण्यात आले; तृतीय क्रमांक- इशाताई गणेश कदम(रामेश्वर कॉलनी) यांना साडी(1,500)व पूजेचे ताट, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले..
तसेच सर्व सहभागी झालेल्या स्पर्धकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सजावट केली असून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांचे व विजेत्यांचे धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, अदिती साडीयाची संचालिका शीलाताई शरद पांडे, कमलताई पाटील, ज्योतिताई राजपूत, छायाताई कोरडे, यश पांडे, हिरामण तरटे, संतोष भिंताडे, निशांत पाटील, प्रकाश मुळीक, सागर बदगुज, ईश्वर शिंदे, मिलींद बडगुजर, धर्मेंद्र चौधरी, प्रमोद महांगडे तसेच धर्मरथ फाउंडेशनच्या सर्वांतर्फे विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.