नंदुरबार (प्रतिनिधी) । जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून दिलीप थोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे, गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शिक्षण विभागाचा प्रभारी पदभार डॉ.राहुल चौधरी यांच्याकडे होता.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला कायमस्वरूपी प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळत नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होते. मावळते उपशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी हा पदभार वर्षभरापासून जरी संभाळला मात्र या दरम्यानच्या काळात शिक्षणासंदर्भातील अनेक अडचणी व तक्रारी अद्या सोडविल्या गेले नसल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे. आता प्राथमिक शिक्षण विभागाला दिलीप पंढरीनाथ थोरे यांच्या रूपाने नवीन शिक्षणाधिकारी मिळणार आहे. थोरे यांची पदोन्नतीने नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी हे देखील बदलीस पात्र असल्याने त्यांचीही बदली होणार असल्याची चर्चा शिक्षण विभागात जोरात सुरू आहे.