Home राजकीय समाजवादी पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

समाजवादी पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर


Flag of Samajwadi Party

लखनऊ (वृत्तसंस्था) समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात जेष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचा समावेश आहे.

सपाच्या पहिल्या यादीत मुलायम सिंग यांच्यासोबत धर्मेंद्र यादव यांना बदायूँ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, फिरोजाबादमधून अक्षय यादव, बहराईचमधून शब्बीर वाल्मिकी, रॉबर्ट्सगंजमधून भोईलाल आणि इटावामधून कमलेश कठोरिया यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या नावांच्या या यादीवर पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांचे हस्ताक्षर आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound