Home Cities जळगाव भाजपा जिल्हा महानगर कामगार प्रकोष्ठ अध्यक्षपदी कुमार सिरामे

भाजपा जिल्हा महानगर कामगार प्रकोष्ठ अध्यक्षपदी कुमार सिरामे

0
33

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगरच्या संघटनात्मक निवड प्रक्रिया सुरु असून जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी आतापर्यंत अनेक आघाड्यांचे अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या कामगार प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी कुमार नथ्थू सिरामे यांची निवड नुकतीच जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी जाहीर केली.

कुमार नथ्थू सिरामे यांनी मेरिको कामगार संघटनेमध्ये अध्यक्ष, खजिनदार व तसेच सचिव पदावर कार्यरत होते. तसेच मेरिको कामगार पतपेढीचे संस्थापक व सचिव १० वर्ष कार्यरत होते. नाभिक समाजाचे सचिवपद कार्यरत आहे तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये ५ वर्षापासून काम करीत आहेत.

यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, विभागीय संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर आ.चंदूभाई पटेल, माजी आ.गुरुमुख जगवाणी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, माजी महापौर सिमा भोळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, वि.क्षे.प्रमुख दीपक साखरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर. नगरसेविका सुरेखा सोनवणे, उपगट नेते राजेंद्र घुगे पाटिल, माजी महापौर सदाशिव ढेकळे, सुनिल पाटील आदी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound