Home राष्ट्रीय पाकचा गोळीबार ; जवांन शहीद

पाकचा गोळीबार ; जवांन शहीद

0
108

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन व घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याकडून आज देखील जम्मू-काश्मीरमधील नौशारा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, गोळीबारात भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार राजविंदर सिंग हे शहीद झाले.

भारतीय लष्कराचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी याबाबत माहिती दिली. नायब सुभेदार राजविंदर सिंग शूर व देशाच्या रक्षणासाठी समर्पित असे सैनिक असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. त्या ठिकाणी देखील एक जवान शहीद झाला आहे. काल रात्रीपासून या परिसरात चकमकीस सुरूवात झाली होती.


Protected Content

Play sound