Home आरोग्य खोटेनगर परिसर व निमखेडी शिवारात सॅनिटायझरची फवारणी

खोटेनगर परिसर व निमखेडी शिवारात सॅनिटायझरची फवारणी


जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे साई मोरया मित्र मंडळातर्फे खोटेनगर परिसर व निमखेडी शिवारातील सर्व गणेश मंडळांमध्ये सॅनिटायझर फवारणी व अर्सेनिक अल्बम ३० गेळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सुरक्षा नगर मित्र मंडळ, मोरया तरुण प्रतिष्ठान, ईच्छापुर्ती मित्र मंडळ साईनगर, मोरया मित्र मंडळ हिरा गौरी पार्क, वैष्णवी नगर मित्र मंडळ अहुजा नगर, विठ्ठलवाडी मित्र मंडळ, रामराज्य ग्रुप मित्र मंडळ निमखेडी, स्वराज्य मित्र मंडळ निमखेडी, मोरया मित्र मंडळ अहुजा नगर, राज नगर मित्र मंडळ, साई समर्थ मित्र मंडळ इत्यादी मंडळांमध्ये सॅनिटायझर फवारणी केली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी साई मोरया मित्र मंडळाचे संस्थापक उमाकांत जाधव, अध्यक्ष धीरज पाटील, अजय खरात, जयेश महाजन, प्रसन्न जाधव, धिरज महाजन, मोनू पाटील, अंकित पाटील यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound