Home राजकीय आपल्यासाठी देश सर्वतोपरी : सिब्बल यांच्या ट्विटने पुन्हा खळबळ

आपल्यासाठी देश सर्वतोपरी : सिब्बल यांच्या ट्विटने पुन्हा खळबळ

0
73

नवी दिल्ली । काल नाराजीचा सूर काढणारे माजी मंत्री कपिल सिब्बल यांच्या आज नवीन ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

काल काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहूल गांधी सोनियांना पत्र लिहणार्‍या नेत्यांवर कडक शब्दांमध्ये टीका केली होती. यामुळे दुखावलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले होते. काही वेळाने त्यांनी हे ट्विट डिलीट केले तरी यामुळे चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, आज पुन्हा कपिल सिब्बल यांनी नवीन ट्विट केले आहे. यात त्यांनी आपल्यासाठी इतर कोणत्याही बाबीपेक्षा देश महत्वाचा असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या या नवीन ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे. हा कोणत्याही पदाचा प्रश्‍न नाही. हा माझ्या देशाचा प्रश्‍न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असं सिब्बल म्हणाले. दरम्यान, सिब्बल यांच्या ट्विटर हँडलवरूनही अनेक शंका व्यक्त करण्यात येत आहेत. सोमवारी पार पडलेल्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेस हे नाव हटवलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.


Protected Content

Play sound