Home Cities जळगाव बेरोजगारांचा मोर्चा जळगावात धडकणार ( व्हिडीओ )

बेरोजगारांचा मोर्चा जळगावात धडकणार ( व्हिडीओ )

0
105

जळगाव प्रतिनिधी । काल भुसावळहून निघालेला बेरोजगारांचा मोर्चा थोड्या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे.

काल दुपारी भुसावळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून जनसंघर्ष मोर्चातर्फे बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा सुरू झाला. यात चार राज्यांमधील युवक सहभागी झाले आहेत. काल रात्री या मोर्चाचा नशिराबाद येथे मुक्काम होता. यानंतर आज सकाळी हा मोर्चा जळगावकडे निघाला. यात सहभागी झालेले तरूण विविध घोषणा देत असून केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निषेध करत आहेत. थोड्या वेळाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल होणार आहे.

पहा : जनसंघर्ष मोर्चातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound