फैजपूर, प्रतिनिधी । शहरातील सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी आज सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान म्युनिसिपल हायस्कुल येथे घेण्यात आली. यात १७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शहरात कोरोना साखळी तोडण्यासाठी पालिकेने शहरातील व्यावसायिक व नागरिकांची कोरोना टेस्ट चाचणी करून घेतली या तपासणी शिबिरात १७५ जणांची तपासणी करण्यात आली असून यात ८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
न्हावी येथील ग्रामीण रुग्णालय व फैजपूर पालिका यांच्या सहकार्याने तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.जे व्यापारी व्यावसायिक स्वतःहून कोरोना चाचणी करून घेणार नाही अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांची दुकाने सील करण्यात येतील असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, डॉ. अभिजीत सरोदे ,पी. एम. पाटील, मनोज चव्हाण, महसूल विभागाचे सर्कल बी. जे. बंगाळे, तलाठी प्रशांत जावळे, नगरपालिकेचे कर्मचारी अश्विनी खैरनार, सुधीर चौधरी, बाजीराव नवले, संतोष वाणी, दिलीप वाघमारे, दिनेश तेजकर, निलेश दराडे, व्ही. एस. जवडे, आरती पाटील व अलका वैद्यकर यांची उपस्थिती होती.