आझमगड वृत्तसंस्था । उर्जा मंत्री नितीन राऊत यांना आझमगड येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखल्यामुळे त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले आहे.
याबाबत वृत्त असे की, उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमिवर अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौर्यावर होते. मात्र दौर्यावर असताना आझमगडच्या बॉर्डर वर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी नितीन राऊत यांना रोखलं आहे.
नितीन राऊत यांना आजमगड सीमा भागात उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरले आहे. यामुळे पोलिसांनी अडवल्यानंतर नितीन राऊत यांनी तिथेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहे. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून केंद्र व उत्तरप्रदेश सरकारचा निषेध केला आहे.