Home Cities जळगाव मू. जे. महाविद्यालयात जागतिक फोटोग्राफी दिवसानिम्मिताने ऑनलाइन वेबिनार

मू. जे. महाविद्यालयात जागतिक फोटोग्राफी दिवसानिम्मिताने ऑनलाइन वेबिनार

0
111


जळगाव, प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागात जागतिक फोटोग्राफी दिवसानिम्मिताने  ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना जेष्ठ पत्रकार विशाल चढ्ढा यांनी मार्गदर्शन केले.

जागतिक फोटोग्राफी दिवसानिम्मिताने  ऑनलाइन वेबिनारप्रसंगी जेष्ठ  फोटोग्राफर पांडुरंग महाले ,लोकमतचे सचिन पाटील,शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ए.आर.राणे, प्रा.निलेश जोशी, संजय जुमनाके व प्रा.संदीप केदार उपस्थित होते.जागतिक फोटोग्राफी बद्दल बोलताना  जेष्ठ पत्रकार विशाल चढ्ढा यांनी पत्रकारिता व फोटोग्राफी यामधील संधी यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.यावेळी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी  ऑनलाइन उपस्थित होते.


Protected Content

Play sound