चाळीसगाव प्रतिनिधी । मेहुणबारे गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या २ ओमनी महसूल पथकाने आज मध्यरात्री पकडले आहे. दोन्ही वाहने मेहुनबारे पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या आहेत.
महसूल पथकाचे गणेश लोखंडे मंडळ अधिकारी मेहुनबारे, डी एस काळे तलाठी वडगाव लांबे, तलाठी , राज डोंगरदिवे तलाठी तळेगाव हे गस्तीवर असतांना मेहुनबारे येथे काळ्या रंगाची ओमनी क्रमांक (एमएच 19 वाय 0427) व विनानंबरची पांढऱ्या रंगाची ओमनी कार मध्ये गिरणा नदीपात्रातुन चोरटी वाळू गोण्या मध्ये भरून वाहतूक करताना मिळून आले पथकाने चालक बाला दगा मोरे (मालक भूषण संजय महाजन रा.मेहुणबारे), चालक व मालक नाना विलास राठोड रा. करगाव यांना ओमनीसह मेहुनबारे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन वाहन जमा करण्यात आले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईपर्यंत सदर ओमनी मेहुनबारे पोलिसांच्या ताब्यात असणार आहे.
दरम्यान मेहुणबारे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू असून चाळीसगाव शहरात देखील रात्रीच्या सुमारास अनेक वाळूचे ट्रॅक्टर भरून येतात व बांधकामांवर वाळू खाली होत आहे. याकडेही महसूल पथकाने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.