जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत महिला व बालविकास भवनाचे उद्घाटन १५ आॅगष्ट रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
महिला व बालविकास भवनच्या उद्घाटनप्रसंगी जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील , जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील , जि. प. उपाध्यक्ष लालसिंग पाटील, प्रल्हादभाऊ पाटील , महिला व बालविकास अधिकारी रफिक रुबाब तडवी , जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी , सर्व विभाग प्रमुख तसेच CDPO , पर्यवेक्षिका , अंगणवाडी सेविका उपस्थित होते.