Home क्राईम दोन लाखांची रोकड चोरणारा पकडला

दोन लाखांची रोकड चोरणारा पकडला

0
54

अडावद ता चोपडा प्रतिनिधी । येथील 2लाख 20 हजाराची रोकड व दोन मोबाईल अशी मोठी घरफोडीच्या गुन्ह्यात एलसीबीने अवघ्या सहा दिवसात दोन पैकी एक चोरास गजाआड केले आहे. दुसऱ्या चोराचा शोध सुरू आहे.

9 ऑगस्ट रोजी पहाटे स्टेट बैंक शेजारी राहणारे जफर खान खलील खान व फजलूल हक अ. रउफ यांच्या दोंघांच्या घरी चोरांनी हात साफ केला होता त्यात त्यांनी जाफर खान यांच्या घरातून चक्क 2 लाख 20 हजाराची रोकड व शेख फाजलुल हक यांच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेले होते .या गुन्ह्यातील मोबाईल अडावद पोलिस ठाण्याचे सपोनि योगेश तांदळे व पीएसआय यादव भदाणे यांनी ट्रेस करून पाटचारीवरून बेवारस स्थितीत हस्तगत केले होते.

स्थानीक गुन्हे शाखेचे पीएसआय सुधाकर लहारे, .एएसआय नारायण पाटील,. रामचंद्र बोरसे., मनोज दुसाने. प्रवीण हिवराले, .दीपक शिंदे यानी चोरिचा आरोपी सुनील अमरसिंग बारेला (रा. गवऱ्यापाडा ता चोपडा) यास चुनचाळे (ता चोपडा) येथून अटक केली आहे.
ज्या नोटांच्या बंडलांचा फिर्यादीत उल्लेख केला आहे, ज्या बैकेतून पैसे आणले होते त्याच बँकेचे नाव असलेले नोटांचे बडल आरोपीकडे सापडले आहे .चोरीस गेलेल्या रक्कमे पैकी 28400 रुपये व एक12 हजार किमतीचा मोबाईल असा एकूण 40 हजार 400 रुपये आरोपी कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपीवर अडावद पोलीस ठाण्यात भाग 5 गु र न 34/20 भा द वी कलम 457-380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस चोपडा न्यायालयात हजर केले असता 18 अगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास अडावद पोस्टे चे पीएसआय यादव भदाणे करीत आहेत.


Protected Content

Play sound