…जर दहा राज्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले, तर देश ही लढाई जिंकेल : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जर या दहा राज्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले तर देश ही लढाई जिंकेल. कोरोनाच्या केसेसचे ७२ तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना केले. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, प. बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

 

यावेळी मोदी म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये टेस्टिंग रेट कमी आहे तिथे सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. त्यामुळे टेस्ट करण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. बिहार, उत्तर प्रदेश, प. बंगाल, तेलंगणा गुजरात राज्यांना अजूनही टेस्टची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत आधीही कमी होते आणि आताही सर्वात कमी आहे. देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी सर्वाधिक या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समिक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या चर्चेतील एकमेकांच्या अनुभवातून खुप काही शिकण्यास मिळाले. तसेच एक बाबही लक्षात आली. जर या दहा राज्यांना करोनावर मात करण्यास यश मिळालं तर आपला देशही ही लढाई जिंकू शकेल, असेही मोदी यावेळी म्हणाले. कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करताना ७२ तासांचा फॉर्म्युला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते ७२ तासांत एखाद्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आपण अनेक जीव वाचवू शकतो. जो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे त्याच्या भोवतालचे किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तींची ७२ तासांत टेस्ट करणं आवश्यक आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाच्या संसर्गाचा विस्फोट झाला होता. चाचण्यांचं प्रमणात वाढवल्यामुळे कोरोनाचा धोका कमी झाला आहे.

Protected Content