Home Cities अमळनेर संत सखाराम महाराज द्विशताब्दी सोहळ्याच्या नियोजनासाठी बैठक

संत सखाराम महाराज द्विशताब्दी सोहळ्याच्या नियोजनासाठी बैठक

0
34

अमळनेर प्रतिनिधी । सदगुरू संत सखाराम महाराज यांच्या द्विशताब्दी सोहळ्याच्या नियोजनासाठी उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

संत सखाराम महाराज यांचा द्विशताब्दी समाधी सोहळा दि २० ते २९ एप्रिल २०१९ या कालावधीत अमळनेर शहरात साजरा होणार आहे. या निमित्ताने उद्या नियोजन बैठक बोलावण्यात आलेली आहे. संस्थानचे गादीपती संत प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि ७ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बोरी नदी पात्रातील ओट्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार तसेच विविध घटकातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत उपरोक्त सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात सादर करण्याबाबत मंथन करण्यात येणार असून याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound