Home आरोग्य माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

0
35

नवी दिल्ली । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली असून आज त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपण एका दुसर्‍या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे.

देशातील अनेक मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या विषाणूचा संसर्ग झाला असून ते सध्या उपचार घेत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आता प्रणव मुखर्जी यांना देखील याचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound