Home आरोग्य केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांना कोरोनाची लागण !

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांना कोरोनाची लागण !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चौधरी यांनीच याची माहिती दिली आहे.

 

जैसलमेरचे खासदार असलेले चौधरी हे मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रात्री त्यांना ताप आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना शंका आल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. चाचणीचे रिपर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जोधपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही कोरोनाची चाचणी नुकतीच पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.


Protected Content

Play sound