Home क्राईम जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या


कुलगाम (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली.

 

कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथे घराबाहेर सज्जाद अहमद खांडे यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, याआधी जून महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडित यांची हत्या केली होती. यापूर्वी जुलैमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागात भाजपा नेते वसीम अहमद बारी आणि त्याचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते.


Protected Content

Play sound