नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात आज सलग आठव्या दिवशी ५० हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात तब्बल २६ हजार २८२ नवीन रुग्ण सापडले तर, ९०४ जणांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ६४ हजार ५३७ झाली आहे. तर मृतांचा आकडा हा ४० हजार ६९९ झाला आहे. संध्या देशात ५ लाख ९५ हजार ५०१ सक्रीय रुग्ण आहेत. तर १३ लाख २८ हजार ३३७ रुग्ण निरोगी झाले आहेत. दरम्यान, बुधवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा १० हजारांहून अधिक संख्येने नवे कोरोना रुग्ण सापडले. याशिवाय ३३४ जणांचा मृत्यूही नोंदला गेला आहे.