अरे व्वा : आज आढळले दोन वर्षातील सर्वात कमी कोरोना रुग्ण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून गेल्या दोन वर्षात राज्यात आज सर्वात कमी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे दोन वर्षानंतर कोरोना ओसरणीला लागल्याचे अधोरेखीत झाले आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या चोवीस तासात ९९ नवे कोरोना संसर्गबाधित रुग्ण आढळून आले असून १८० रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये एकही मृत्यू झालेला नाही. तसेच राज्यात सध्या १,२७३ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दोन वर्षात एका दिवसातील ही सर्वात कमी रूग्णसंख्या असल्याची बाब लक्षणीय आहे.

राज्यात आजवर ७७,२३,४६८ एकूण रुग्ण बरे झाले आहेत. तर, आजचा कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच दिवसभरात एकही मृत्यू न झाल्यानं राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट हा ०९.९७ टक्के आहे.

दरम्यान, राज्यात पुण्यात सध्या सर्वाधिक ३५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत २९९ ऍक्टिव्ह रुग्ण तर तिसर्‍या क्रमांकावर ठाण्यात १५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Protected Content