चंद्रपूर जिल्ह्यात अपघातात सहा जण जागीच ठार

चंद्रपूर । भरधाव स्कॉर्पिओने रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून सहा गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content