चाळीसगाव प्रतिनिधी । अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने केलेली आत्महत्या संशयास्पद असल्याचे अनेक मुद्दे चर्चेत आहेत. या आत्महत्येचा तपास सीबीआय कडे द्या अशी मागणी करणीसेनेने केली आहे.
बिहारमधील एका छोट्या गावातून येऊन अभिनय क्षेत्रात नावलौकीक मिळवित असलेला हा कलाकार आत्महत्या करतो. मुळातच हे पटण्यासारखे नसून चित्रपटसृष्टीत अल्पावधीत त्याने कमविलेले नाव यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी देखील वाढले होते सुशांत याच्या आत्मह्येचा फोटो पाहिल्यानंतर त्याने स्वत: गळफास घेतल्याबाबत शंका निर्माण होते. गळफास घेतल्यानंतरची चिन्हे देखील संशय निर्माण करतात त्याच्या मृत्यूचा तपासात मुंबई पोलीसांवर दबाव येवून वस्तुस्थिती लपविली जावू शकते. या अनुषंगाने हा तपास सीबीआय कडे देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना चाळीसगावच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन तहसिलदार यांना आज देण्यात आले.
युपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात अनिकेत सचानचे यश
यावेळी करणीसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अभयसिंह राजपूत, प्रदेश महासचिव प्रेमसिंह राजपूत, प्रदेश प्रवक्ता सुनिलसिंह राजपूत, तालुकाध्यक्ष विरेंद्रसिंह राजपूत, प्रदेश प्रवक्ता मंगलसिंह कच्छवा, महिला प्रदेश महामंत्री सुचित्रा राजपूत, महिला प्रभारी सविता राजपूत, अभिजीत ठोके, पप्पु राजपूत, अमोल राजपूत, भिमा राजपूत, जितेंद्र राजपूत, संतोष राजपूत, दिनेश राजपुत, उदेसिंह राजपुत, शरद राजपूत, दिग्वीजसिंह राजूपत, मंगलसिंह ठोके तसेच करणी सेनेचे तालुकाध्यक्ष योगेंद्र राजपूत यां च्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सुशांतसिंह च्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची बिहार सरकारची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे.
श्रीराम मंदिर भूमिपुजनाचे खासदार रक्षा खडसे यांनी केले स्वागत