यावल (प्रतिनिधी) रक्षाबंधन सणानिमित्त यावल शहर पोलीस स्थानकात महिला पोलीस कर्मचारी भगिनींनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी व सहकारी कर्मचारी बांधवाना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावल पोलीस स्थानकाच्या इतिहासात प्रथमच असा भावनिक कार्यक्रम झाला आहे.
आपल्या कार्यपद्धतीने नाविन्यपुर्ण समाजहिताचे अभीनव उपक्रम राबविणारे कार्यतत्पर पोलीस निरिक्षक अरूण धनवडे व त्यांच्या सहकारी यांनी आज रक्षाबंधनच्या पवित्र दिनी आपल्या विभागात सेवारत असलेल्या पोलीस कर्मचारी भगीनींच्या हस्ते ओक्षण करून राखी बांधुन घेतली. ‘दुर जरी माझी जन्माची भगीनी : तिची उणीव भरूनी काढीली माझ्या खात्यातील भगीनींनी’ असे भावनिक उध्दगार काढले यावल पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकारींनी काढले. आजपर्यंतच्या इतिहासात यावल पोलीस स्थानकात प्रथम भाऊ बहीणींच्या पवित्र अटुट विश्वासाची व प्रेमाची साक्ष देणारे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्यासह इतर पोलीस बांधव उपस्थित होते.