Home क्राईम गाढोदा येथे शेतकर्‍याची आत्महत्या

गाढोदा येथे शेतकर्‍याची आत्महत्या

0
44
death

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील गाढोदा येथील शेतकर्‍याने आपल्या शेतातच ठिकबच्या नळीच्या फासाने आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, गाढोदा येथे प्रकाश मानसिंग पाटील यांनी आज आपल्या शेतातील ठिबकच्या नळी निंबाच्या झाडाला बांधत गळफास घेतला. पोलीस पाटील भगवान मधुकर पाटील यांनी प्रकाश पाटील यांना तत्काळ खाजगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार प्रकाश मानसिंग पाटील यांचे घरच्यांशी वाद झाले होते. यातूनच त्यांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.


Protected Content

Play sound