अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये त्यांचा मुलगा आणि मुलीचाही समावेश आहे.
आमदार रवी राणा यांच्या आई-वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सोमवारी समोर आले होते. यानंतर राणा कुटुंबातील आणि इतर संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात रवी आणि नवनीत राणा यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतू, मुलगा, मुलगी यांच्यासह कुटुंबातील १० जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास ५० ते ६० जणाची कोरोना चाचणी घेण्यात आली. तर नवनीत कौर राणा यांच्या सासू-सासऱ्यांना उपचारासाठी नागपूरच्या ओक हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले आहे