विदयार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढीसाठी ज्ञानरचनावादी शिक्षण उपयुक्त -प्रतिभा भराडे

जळगाव (प्रतिनिधी) विदयार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी ज्ञानरचनावादी शिक्षण उपयुक्त असून त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी केले. त्या ‘शिक्षक -मूल नातेसंबंध व ज्ञानरचनावाद ‘या विषयावर ऑनलाईन वेबिनारमध्ये बोलत होत्या. शिक्षण विभागाच्या ऑनलाईन वेबिनारचा सातशे शिक्षकांनी घेतला लाभ घेतला.

 

 

शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, क्रिएटिव्ह टीचर्स क्लब, तंत्रस्नेही शिक्षक ग्रुप आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने टाळेबंदीच्या काळात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन वेबिनारद्वारे शिक्षक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत असून चौदाव्या सत्रात सातारा येथील राज्यस्तर तज्ञ तथा शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी ‘शिक्षक-मूल नातेसंबंध व ज्ञानरचनावाद’ या विषयावर शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. ज्ञानरचनावादी अध्यापन प्रक्रिया समजून सांगताना कुमठे बिट मधील शैक्षणिक प्रयोग, विदयार्थ्यांच्या मेंदूचे कार्य, शिक्षकाची भूमिका याविषयी प्रतिभा भराडे यांनी सविस्तर संवाद साधला. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले. धरणगावचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल चौधरी यांनी सूत्रसंचलन तर संदीप सोनार यांनी आभार प्रदर्शन केले.

 

सातशे शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी. एन.पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस. अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार , किशोर वायकोळे, राहुल चौधरी , प्रभात तडवी या वेबिनार साठी परिश्रम घेत आहे. त्यांना मनोहर तेजवाणी, संभाजी हावडे, सुनील बडगुजर, भूषण महाले, संदीप सोनार, सुनील पवार सहकार्य करत आहेत.

Protected Content