राजस्थानमधील घोडेबाजारात पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा सहभाग : अशोक गेहलोत

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी सुरु असलेल्या घोडेबाजारात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला आहे.

 

अशोक गहलोत म्हणाले, भाजपचा घोडेबाजाराचा खेळ खूप मोठा आहे. त्यांच्या तोंडाला रक्त लागले आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश ते यशस्वी झाल्यामुळेच ते आता राजस्थानमध्ये प्रयोग करत आहेत. देशाचे गृहमंत्रालयच या कामात सहभागी आहे. धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांचा या घोडेबाजारात सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने राजस्थानमध्ये सुरु असलेला तमाशा बंद करायला हवा. राजस्थानमध्ये घोडेबाजाराचे दर वाढले आहेत. विधानसभेच्या अधिवेशनाची घोषणा होताच त्यांनी घोडेबाजाराचे दर आणखी वाढवले आहेत, असे अशोक गहलोत म्हणाले.

Protected Content