कोरोनाची साथ रोखण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’वर अवलंबून राहता येणार नाही ; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताची लोकसंख्या १३८ कोटी आहे. अशी लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाची साथ रोखण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’वर अवलंबून राहता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केले आहे.

 

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी सांगितले की, ‘हर्ड इम्युनिटी’ हे अप्रत्यक्ष संरक्षण आहे. लसीकरणानंतर किंवा पूर्वीच्या आजाराने बरे झालेल्या रूग्णांमध्ये हर्ड रोग प्रतिकारशक्ती असते. भारताची लोकसंख्या १३८ कोटी आहे. अशी लोकसंख्या असलेल्या देशात लसीशिवाय समूहातून प्रतिकारशक्ती विकसित करणे योग्य नाही. हे अत्यंत धोकादायक आहे. थोडक्यात भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. लस दिल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Protected Content