Home राजकीय पंतप्रधान मोदींप्रमाणे खोटे बोलायला शिका ; काँग्रेसने ट्विट केला ‘क्रॅश कोर्स’

पंतप्रधान मोदींप्रमाणे खोटे बोलायला शिका ; काँग्रेसने ट्विट केला ‘क्रॅश कोर्स’


Video

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे खोटे बोलायला शिका अशा मथळ्याखाली काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात तीन सोप्या स्टेप फॉलो करुन तुम्ही ‘भारतातील सर्वात मोठा खोटारडा’ होण्याच्या शर्यतीत मोदींना हरवू शकता, असा मजकूर वापरून काँग्रेसने ३ मिनिटे २० सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटच्या शेवटी #ModiLies हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

काँग्रेसने तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये उपहासात्मक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. सुरुवातील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे, ‘देअर वील बी नो लाइज’ (म्हणजेच या पुढे खोटे खपवून घेतले जाणार नाही) हे वाक्य दाखवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ‘इस सज्जन को क्या तकलीफ हैं भाई’ हे मोदींच्या एक सभेतील त्यांच्याच तोंडचे वाक्य असणारी क्लिप वापरण्यात आली आहे. अनेकदा फॉरवर्ड होणारे मेसेजेस, मोदींकडून देण्यात येणारे चुकीचे संदर्भ या सर्वांचा आधार घेत आम्ही तुम्हाला मोदींप्रमाणे खोटे कसे बोलावे याबद्दलचा हा क्रॅश कोर्स शिकवणार असल्याचे काँग्रेसने व्हिडीओत म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound