नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मला असे का वाटतेय सुशांतची हत्या करण्यात आली आहे, असे खळबळजनक ट्वीट केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरत असतांनाच मला असे का वाटतेयय की सुशांतची हत्याच झाली आहे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. यासोबत त्यांनी एक कागदपत्रदेखील शेअर केला आहे. त्यात सुशांतची आत्महत्येऐवजी हत्या असल्याच्या विविध मुद्द्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचे नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचे आहे. मला काही सुचत नाही, असे सुशांतचे म्हणणे होते, असा खळबळजनक खुलासा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने बिहार पोलिसांकडे केला आहे. तर अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अटकपूर्व जामीनसाठी धावपळ सुरु केली आहे.