Home Cities जामनेर पहूरपेठ येथील जीर्ण इमारत कोसळली

पहूरपेठ येथील जीर्ण इमारत कोसळली

0
44

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथे आज जीर्ण इमारत कोसळली असून यात सुदैवाने प्राणहानी टळली आहे.

पहूर पेठ येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ सुमारे १०० वर्षांची जीर्ण दुमजली इमारत आज सकाळी कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतू इमारतीच्या शेजारील रहिवाशी मात्र बालंबाल बचावले आहेत . कोसळलेल्या इमारतीच्या शेजारीच राहणार्‍या शांताराम गोंधनखेडे यांच्या घरावर इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीमध्ये कुणी राहत नसल्याने प्राणहानी टळली आहे.

दरम्यान, पहूर पेठ गावात काही इमारती जीर्ण झाल्या असून ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


Protected Content

Play sound