शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मास्कचे वाटप करण्यात आले.
येथे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शेंदुर्णी शहर शाखेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम गरजू लोकांना मास्क वाटप केले तसेच कोरोनाच्या संकट काळात आपली सेवा बजावणारे कोरोणा योद्धा यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभो या संकल्पनेला वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिवसेना शेंदुर्णी शहर प्रमुख भैया गुजर, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक बारी, विलास बारी, माजी युवा सेना तालुका प्रमुख विनोद नाईक, सुनील गुजर, सिद्धेश्वर पाटील, भरत पाटील भूषण बडगुजर, युवा सेनेचे सोनू पगारे, राहुल कुमावत, लखन कुमावत, प्रवीण चौधरी, विलास पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.