रावेर, प्रतिनिधी । कोरोनाच्या महामारीत आलेली बकरी ईद शांततेत साजरी करा. शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे बकरी ईद साजरी करा. कोणीही कायदा- सुव्येवस्थाचा प्रश्न कोणीही निर्माण करू नका. दंगलीचा धडा घ्या रावेर शहरा बद्दल विशिष्ठ प्रकारची माहिती पोलिस प्रशासनाकडे मिळाली असुन शांतता भंग करणा-यांवर आमची करडी नजर असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी रावेर आयोजित बकरी ईदच्या बैठकीत केले.
या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले, पोलिस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, सा.पो.नी शितलकुमार नाईक,पोलिस उपनिरिक्षक सुनिल कदम, मनोज वाघमारे आदी उपस्थित होते
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी कॉग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,अँड योगेश गजरे, कामगार नेते दिलीप कांबळे, नगर सेवक राजेंद्र महाजन,शेख साजिद,असदउल्ला खा, गोपाळ बिरपन,बाळु शिरतुरे,पोलिस पाटील लक्ष्मीकांत लोहार,शेख मेहमूद अशोक शिंदे,ई जे महाजन, मुस्लिम पंच कमेटी शेख गयास,रफीक टेलर, आरीफ सैय्यद, नितीन पाटील, हीरालाल सोनवणे,सरपंच अनिल चौधरी,शेख कौसर,तन्विर खान,शेख अख्तर हुसेन अयूब खा, अब्दुल कदिर,शेख कलीम,दिनकर वानखेडे,वन विभागाचे श्री धोबी,पशु वैद्यकीय अधिकारी रनजीत पाटील, डॉ सुरेश पाटील, संतोष पाटील, शैलेंद्र अग्रवाल,आदी उपस्थितीत होते
कोण काय म्हणाले…
डॉ अजित थोरबोले (प्रांतधिकारी):– बकरी ईद दरम्यान गर्दी करू नका कोरोनाचे लक्षणे आढळल्यास कोविड सेंटरला दाखल व्हा
भाग्यश्री नवटके(अप्पर पोलिस अधिक्षक):- रावेरात शांतता भंग करणा-यांचा सत्कार करू नका तर शांतता प्रस्थापीत करणा-यांचा सत्कार करा
रामदास वाकोडे (पोलिस निरिक्षक):- बकरी ईद शांततेत साजरी करा शहरात दंगलमुळे उद्योगधंदे येत नाही पुढच्या पीढीचे भविष्य उध्वस्त करू नका
शितलकुमार नाईकांचे एसपी कडून कौतुक
रावेर दंगल तात्काळ आटोक्यात आणल्या बद्दल साहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांचा पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी कौतुक केले