जळगाव प्रतिनिधी । शालेय, महाविद्यालयीन व खासगी शिकवणी वर्ग यांची फी वसुली बंद करण्याची मागणी जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने अनेकांना शैक्षणिक आर्थिक समस्यांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीव सर्व शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश आहे. तसेच खासगी शिकवणी देखील बंद आहेत. असे असतांना शाळा, महाविद्यालयीन व खासगी शिकवणी वर्ग यांनी पुढील वर्षाची फी वसूली करण्यास सुरूवात केली आहे. अशी बेकायदेशीररित्या शैक्षणिक संस्था फी वसूली करत असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांचे खच्चीकरण केले आज जात आहे. या खच्चीकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील काही गरीब विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
संघटनेच्या या आहेत मागण्या
शालेय शिक्षण सुरू होत नाही तोपर्यंत कुठलीही फी आकारली जावू नये किंवा ऑलनलाई शिक्षण सुरू असतांना पालकांना फी भरण्यास वेठीस धरू नये. ऑनलाईन शिक्षण प्रणाली सर्व विद्यार्थ्यांना शक्य नसुन तो भाग वगळता गरीब विद्यार्थ्यांचा देखील विचार करण्यात यावा. आणि संबंधित विद्यालय आणि महाविद्यालयांनी आकारलेली फी विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी. या मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थी संघटनेच्यावतीने संबंधित महाविद्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनावर मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील, महानगराध्यक्ष योगेश पाटील, शहर उपाध्यक्ष पंकज चौधरी, महाराष्ट्र सैनिक संदीप महाले, राहूल पाटील, जयेश बाविस्कर, ज्ञानेश वंजारी, तुषार पाटील, तुषार पाठक, अमोल वाणी, कुणाल माळी, राजेंद्र निकम, आर.डी.राव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=206542307466901