सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सावदा रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री अज्ञात माथेफिरूने लक्ष्मण काशिनाथ शिंदे यांच्या कोल्डे स्टोअरेज युनिटमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लावून पेटवून दिले.
सावदा रेल्वे स्थानकाजवळ लक्ष्मण काशिनाथ शिंदे यांचे कोल्ड स्टोअरेज आहे. काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास अज्ञात माथेफिरूंनी त्यांच्या शेडमध्ये उभ्या असणार्या दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लावली.
यात चोर्यांनी सुरक्षा रक्षकालाही मारहाण केली. दरम्यान, अग्निशामन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्यास मदत केली. लक्ष्मण शिंदे यांच्या सीसीटिव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून त्याचा तपास करण्यात येत आहे.
खालील व्हिडीओत पहा गाडीला आग लावतांना सीसीटिव्हीत दिसणारा माथेफिरू
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2688266534766115