धरणगाव तालुक्यात आज सापडले १९ कोरोना पॉझिटिव्ह !

 

धरणगाव, प्रतिनिधी |  धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज (बुधवार ) दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात रेल, पिंप्री ,वराड बुद्रुक, साळवा, सर्वे खुर्द, निशाणे बुद्रुक, मुसळी, आनोरा, बांभोरी प्र.चा., पाळधी खुर्द येथील रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

धरणगाव कोवीड केअर सेंटरला बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात रेल ५, पिंप्री आणि वराड बुद्रुक प्रत्येकी ३ तर साळवा २, सर्वे खुर्द , निशाणे बुद्रुक, मुसळी, आनोरा, बांभोरी प्र.चा.आणि पाळधी खुर्द प्रत्येकी एकाच समावेश आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३८३ झाली आहे. तर साधारण ९९ रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत साधारण २६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २३ जण मयत झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content