फैजपूर, प्रतिनिधी । शहरातील इस्लाम धर्मातील पैगंबर मोहम्मद स यांचा जीवनावर बनवण्यात आलेलं डिजिटल चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी येथील मुस्लिम समुदायातर्फे प्रांताधिकारी डाॅ. अजित थोरबोले, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यानां देण्यात आले.
पैगंबर मोहम्मद स यांचा जीवनावर बनवण्यात आलेल्या डिजिटल चित्रपटामुळे सामाजिक एकोप्यास तळा जाऊ शकतो. भारतातील गुण गोविंदने नांदत असलेल्या विविध जातींचे लोक असुन मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावणार अशा प्रकारे दोन समाजात कटुता निर्माण होइल असे चित्रपट बनवण्याचं हेतू आहे. याचं कारण शोधून चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली आहे. यावेळी फैज़पुर शहराचे उपनगराध्यक्ष रशिद तडवी, माजी नगरसेवक शेख जफर,राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते शेख कुरबान, काँग्रेस गटनेते कलिम खान,शेख अ जलील,हाफीज़ अनस, आसीफ मॅकेनिक सामाजीक कार्यकर्ते शेख रियाज, युवक काँग्रेसचे विधानसभा कार्याध्यक्ष मुदस्सर नजर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वसीम जनब, सह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.