विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहुर येथे पोलिसांचे पथसंचलन

pahur

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिस दलाच्या वतीने आज शहरात पथसंचलन करण्यात आले. शहरातील विविध रस्त्यांवरून फिरून पोलिसांनी आपली ताकद दाखवली.

शहरात पथसंचलन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हे पथसंचलन पो.स्टे. पहुर येथून बस स्थानक, बाजार पट्टी, उभी गल्ली, देशमुख गल्ली, जामा मशीद, खाटीक गल्ली, कैकाडी गल्ली, विठ्ठल मंदिर इथून पुन्हा बस स्थानक पो.स्टे परत मार्गाने रूट मार्च घेण्यात आला. या रूट मार्चमध्ये पोनी-१, सपोनि-१, पीएसआय- 1 आरपीएफचे 48 जवान, पोस्टेचे 6 कर्मचारी, व होमगार्ड 20 असे एकूण 77 जवान सहभागी झाले होते.

Protected Content