Home Cities जळगाव जळगावातील नगरसेवकाने केली रस्त्याची दोन दिवसात डागडुजी; मनसेच्या मागणीला यश

जळगावातील नगरसेवकाने केली रस्त्याची दोन दिवसात डागडुजी; मनसेच्या मागणीला यश


जळगाव प्रतिनिधी । प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्त्यावरील पाणी तुंबल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माणसेनेने नगरसेवक दिलीप पोकळे यांच्याकडे केली होती. तक्रारीची दखल घेत दोन दिवसात नगरसेवक पोकळे यांनी रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता सुरळीत करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, जळगाव महानगरपालिकेच्या शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये गेल्या महिनाभरापासून रस्ता पाण्याने तुंबल्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना या रस्त्यावरून चालणे खूप बेताचे झाले होते. यासंबंधी प्रभागातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी संदीप महाले यांनी प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक दिलीप पोकळे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून दोन दिवसात रस्त्याची डागडुजी करण्याबाबत मागणी व आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत प्रभागातील नगरसेवक दिलीप पोकळे यांनी मनपा प्रशासनाकडून प्रभागातील मुख्य रस्त्यांवर दोनच दिवसात मुरुम टाकण्यात आला आहे. याबाबत या परिसरातील नागरीकांनी नगरसेवक दिलीप पोकळे व महाराष्ट्र सैनिक संदीप महाले यांचेही आभार मानले.


Protected Content

Play sound