Home राजकीय प्रशासकांच्या नेमणुका राज्यपालांच्या परवानगीशिवाय होऊ नये : प्रकाश आंबेडकर

प्रशासकांच्या नेमणुका राज्यपालांच्या परवानगीशिवाय होऊ नये : प्रकाश आंबेडकर


मुंबई (वृत्तसंस्था) मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर राजकीय प्रशासक नेमणुकीला बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. राजकीय पक्षांनी दुकानदारी उघडल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. प्रशासकांच्या नेमणुका राज्यपालांच्या परवानगीशिवाय होऊ नये, यासाठी आंबेडकर यांनी राज्यपालांकडे विनंती केली. आज आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर ते बोलत होते.

 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोरोना हे शासनाचे नाटक असून मागच्या वर्षीच्या मृत्यू दरापेक्षा यावर्षीचा मृत्यू दर खूप कमी आहे. युद्ध असले तरी निवडणुका घेतल्याच पाहिजे. तसेच कोरोनाच्या नावाने सरकार आपलेच राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर राजकीय प्रशासक नेमणुकीला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. त्यांनी राजकीय पक्षांनी दुकानदारी उघडल्याचा आरोप देखील केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पत्राचा दाखला देत प्रशासक नेमणुकीसाठी 11 हजार रुपयांचा पक्ष निधी घेऊन दुकानदारी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाची शपथ घेतलेल्या व्यक्तीलाच प्रशासक म्हणून नेमता येतं ही बाब त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली.


Protected Content

Play sound