कोल्हापूर (वृत्तसंस्था) ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास समजत नसल्याच्या नैराश्येतून बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ऐश्वर्या पाटील असे मयत तरूणीचे नाव आहे.
करवीर तालुक्यातील वाशी या गावात राहणारी ऐश्वर्या पाटील ही एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोना संसर्गामुळे सध्या शिकवण्याचे वर्ग ऑनलाईन सुरू होते. पण ऑनलाईन शिक्षण तिला समजत नव्हते. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून निराश होती. याच नैराश्यातून तिने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेतला.