सावदा ता.रावेर प्रतिनिधी । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गुरूवारी बारावीचा निकाल घोषीत झाला. या निकालात येथील ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९३.३६ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून आकांक्षा महाजन तर कला शाखेतून कुणाल कोळी हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे.
शहरातील श्री.आ.गं.हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल गुरूवारी जाहीर झाला असून महाविद्यालयाचा ९३.३६ टक्के निकाल लागला. यात विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कला शाखेचा ८८.२५ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून आकांक्षा रविंद्र महाजन हिने ८५.२३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली तर मयुर कन्हैय्या पाटील याने ८४ टक्के गुण मिळवून द्वितीय आला आहे. तसेच कला शाखेतून कुणाल रविंद्र कोळी (७८ टक्के) गुणांनी प्रथम तर द्वितीय तिलोत्तमा धनराज शिंदे हिने (७४.९२टक्के)गुण मिळविले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्षा अनिता येवले, उपनगराध्यक्षा विश्वास चौधरी, शिक्षण समिती सभापती करूणा पाटील, गटनेता अजय भारंबे, गटनेता फिरोजखान हबीबबुल्ला खान पठाण, राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी यांच्यासह आजी माजी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी सौरभ जोशी, मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे, पर्यवेक्षक जे.व्ही.तायडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.