Home Cities भुसावळ भुसावळात भाजपतर्फे मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

भुसावळात भाजपतर्फे मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

0
37

भुसावळ प्रतिनिधी । येथे आज सकाळी भारतीय जनता पक्षातर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या निर्देशांनुसार आज देशभरात विविध ठिकाणी पक्षातर्फे दुचाकी रॅली काढण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यात आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून याला प्रारंभ झाला. शहराच्या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. यात वंद मातरम, भाजपचा विजय असो अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

रॅलीच्या समोरोपाप्रसंगी आमदार संजय सावकारे म्हणाले की, हा भाजपचा नियोजित कार्यक्रम होता. याच्या माध्यमातून शहरातून जनजागृती करण्यात आली असून शहरवासियांनी याला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

पहा :- भाजपच्या मोटारसायकल रॅलीचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound